आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मोठ्या बांधकामासाठी खूप पाणी लागते. त्यासाठी बाेअर, विहिरीतून पाणीपुरवठा होतो. आता या बांधकामांना रिसायकल केलेले पाणी पुरवण्याचे नियोजन मनपाने सुरू केले आहे. मनपाच्या एसटीपी प्लँटवर शुद्ध होणारे पाणी या बांधकामांना माेफत दिले जाईल. व्यावसायिक बांधकामासाठी हे पाणी घेणे बंधनकारक असेल. या पाण्यामुळे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडावर काही परिणाम होईल काॽ याची चाचपणी करण्यात येत आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर ही योजना राबवण्यात येईल. भूमिगत गटार योजनेतून कांचनवाडी, पडेगाव व झाल्टा येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारलेले आहेत. कांचनवाडी प्रकल्प सर्वात मोठा असून त्याची क्षमता १६१ एमएलडी आहे. सध्या त्यातून प्रक्रिया होऊन रोज ६० एमएलडी पाणी बाहेर पडते.
शेतीसाठी वापर सुरू गेल्या वर्षी झाल्टा येथील एसटीपी प्लँटमधून प्रक्रिया हाेणारे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांनी गट बनवल्यानंतर त्यांना पाइपलाइनद्वारे हे पाणी पुरवण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.