आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा संकलन नीट:रेड्डी कंपनीला 50 हजारांचा दंड

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेड्डी कंपनी झोन क्रमांक ९ मध्ये योग्य द्धतीने कचरा संकलन करत नसल्याचा ठपका ठेवत मनपाचे सहायक आयुक्त असद्दुला खान यांनी ५० हजारांचा दंड ठोठावला आहे.

मनपाकडून रेड्डी कंपनीस प्रतिटन कचऱ्यामागे १९०० रुपये दिले जातात. मनपाच्या रेकॉर्डनुसार ही कंपनी शहरात दररोज चारशे टन कचरा उचलून प्रक्रिया केंद्रात नेते. त्यासाठी महिन्याकाठी सव्वादोन कोटी रुपये कंपनीला मिळतात. करारानुसार कंपनीच्या घंटागाड्यांनी घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे बंधनकारक आहे. परंतु काही भागात कंपनीच्या घंटागाड्या नियमितपणे जात नसल्याची तक्रार आहे. झोन क्रमांक ९ मध्ये घंटागाड्या येत नसल्याने नागरिक नाइलाजाने घरातील कचरा रस्त्यावर टाकत आहेत. त्यामुळे एसएससी बोर्ड, रेल्वेस्टेशन रोडवरील पीडब्ल्यूडी क्वार्टर, हॉटेल विट्स ते आनंद गाडे चौक आणि रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...