आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची मागणी:महापालिकेचा प्रभाग आराखडा नव्याने करा; शिवसेनेची मागणी

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर व्हायरल झालेला प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा व प्रत्यक्षातील आराखडा सारखाच आहे. त्यामुळे तो रद्द करून नव्याने तयार करा, अशी मागणी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे व शिष्टमंडळाने सोमवारी मुंबईत राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. मनपाचा प्रभाग प्रारूप आराखडा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे गोपनीयतेचा भंग झाला आहे. त्यामुळे तो रद्द करून नव्याने तयार करावा, अहवाल व्हायरल करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गुगल अर्थच्या नकाशावर प्रगणक गटांच्या सीमारेषा हिरव्या रंगाने दर्शवाव्यात, प्रगणक गटांचे क्रमांक व त्या गटांची लोकसंख्या दर्शवावी, जनगणना प्रभागांच्या सीमा निळ्या रंगाने दर्शवाव्यात, नकाशावर शहरातील महत्त्वाची ठिकाणे, रस्ते, नद्या-नाले, रेल्वेलाइन इत्यादी स्पष्टपणे दर्शवावे, नवीन निवडणूक प्रभागांच्या हद्दी लाल रंगाने दर्शवाव्यात, नकाशांचा आकार, त्यावर दर्शवलेले प्रगणक गटांचे क्रमांक, लोकसंख्या इत्यादी तपशील वाचता येईल असा असावा, नकाशे हाताळता यावेत यासाठी दोन किंवा तीन भागात तयार करावेत तसेच प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा करावा, त्याच्या हद्दी स्पष्टपणे दर्शवण्यात याव्यात, त्या हद्दीवर असणारे रस्ते, नदी-नाले, रेल्वेलाइन इत्यादी स्पष्टपणे असावेत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. या वेळी माजी आमदार किशनचंद तनवाणी, अॅड. आशुतोष डंख उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...