आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MSC च्या 3 अभ्यासक्रमांचे पुर्नमुल्यांकन निकाल प्रलंबित:विद्यार्थ्यांना तशीच द्यावी लागली परीक्षा; 2 शुल्कांचा झाला भुर्दंड

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाने एम.एस्सी.तील तीन अभ्यासक्रमांचे रिड्रेसल (पुर्नमुल्यांकन) निकाल अद्याप जाहीर केले नाहीत. नापासांनी २२ डिसेंबरपासून संबंधित विषयांच्या परीक्षाही दिल्या आहेत. तरीही निकाल लावले नाहीत. त्यामुळे परीक्षा अर्ज शुल्क आणि रिड्रेसल शुल्क अशा दोन प्रकारचा आर्थिक भुर्दंड विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा जून-२०२२ मध्ये घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल ७ ऑक्टोबरला जाहीर केला गेला. यंदाच्या शैक्षणिक सत्रात विक्रमी विद्यार्थी नापास झाले होते. त्यामुळे निकालानंतर विद्यापीठाने ७ ते १५ ऑक्टोबरपर्यंत रिड्रेसलसाठी अर्ज मागवले होते. एका विषयासाठी झेरॉक्सला शंभर रूपये तर रिड्रेसल शुल्कापोटी दोनशे असे एकत्रित तीनशे रूपये घेतले गेले.

१५ ऑक्टोबरनंतर १० दिवसांनी म्हणजेच २५ ऑक्टोबरपर्यंत निकाल घोषित करणे अपेक्षित होते. पण रिड्रेसलसाठी अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवसानंतर ७० दिवस उलटले. तरीही निकाल लागले नाहीत. दरम्यान नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले. २२ डिसेंबरपासून संबंधित विषयांचे पेपरही झाले आहेत. पण पुर्नमुल्यांकनाचे निकाल जाहीर झाले नाहीत.

दीड हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न-

एमएस्सी (रसायनशास्त्र)एक हजार जणांनी रिड्रेसल अर्ज केले. त्यापैकी सातशे जणांनी पुर्नमुल्यांकनासाठी सादर केले. एमएस्सी (गणित) अभ्यासक्रमांच्याही पाचशे जणांनी अर्ज केले. तीनशे जणांनी पुन्हा मुल्यांकनासाठी आणून दिले. एमएस्सी (संगणकशास्त्र)प्रथम वर्षांच्या ५० जणांनी अर्ज केले होते. त्यांचेही निकाल प्रलंबित असल्याची माहिती आहे. परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या मते पुर्नमुल्यांकनासाठी आम्ही त्या त्या प्राध्यापकांना मुल्यांकनासाठी बोलवले पण त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. म्हणून निकालास उशीर झाला. पण आता काही दिवसांत निकाल जाहीर केले जातील. असेही सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...