आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळा:राज्यात विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या संख्येतही कपात, दोन ऐवजी आता एकच गणवेश मिळणार, 86.48 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

हिंगोली (मंगेश शेवाळकर )3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाते.

राज्यात कोविडमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश वाटपावर परिणाम झाला आहे. आता शासनाकडून शाळा सुरु करण्याबाबत संभाव्य बाब लक्षात घेऊन मोफत गणवेश वाटपाच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना दोन ऐवजी एकच गवणेश मिळणार असून त्यासाठी ८६.४८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

राज्यात समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाते. यामध्ये इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील सर्व मुली तसेच अनुसुचीत जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना या गणेवशाचा लाभ दिला जातो. प्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणेवश दिले जातात. गणवेश शिलाई व वाटपाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आली आहे.

दरम्यान यावर्षी कोविडमुळे शाळा बंद असल्याने गणवेश वाटपावर त्याचा परिणाम झाला आहे. ऑनलाईन शाळा सुरु असल्या तरी गणवेश वाटपाबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यानंतर आता शासनाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानंतर आता शासनाकडून इयत्ता १ ली ते ८ वीचे वर्ग सुरु करण्याची संभाव्य बाब लक्षात घेऊन शासनाने गणवेश वाटपाचा निर्णय घेतला आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेश वाटप केले जाणार असून विद्यार्थ्यांना एकच गणवेश दिला जाणार आहे. राज्यातील विद्यार्थीसंख्ये नुसार ८६.४८ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे. प्रत्येक जिल्हयाला निधी मंजूर करण्यात आला असून शाळा व्यवस्थापन समितीने कापड खरेदी करून गणवेश शिलाई करून वाटप करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना एक गणवेश मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...