आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ओरिजिनल:कोरोनाकाळात विमान कंपन्यांविरुद्ध रिफंडच्या तक्रारींत 10 पटींनी वाढ, पैकी 94% एकट्या एअर इंडियाकडील 250कोटींच्या थकबाकीसाठी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो  - Divya Marathi
फाईल फोटो 

कोरोनाकाळात विमानसेवा बंद झाल्याने प्रवाशांना तिकिटे रद्द करावी लागली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांनी प्रवाशांना १००% पैसे परत करण्याचे आदेश दिले. तरीही परतावा मिळत नसल्याने प्रवाशांनी डीजीसीएकडे धाव घेतली. दोन वर्षांत डीजीसीएकडील एकूण तक्रारींपैकी ४४% एकट्या "रिफंड'शी संबंधित आहेत. त्यात सर्वाधिक ९४% एअर इंडियाच्या बाबतीत असून २५० कोटींचा रिफंड थकला आहे.

कोरोनामुळे मार्च २०२० पासून देशांतर्गत व परदेशी विमानसेवेवर निर्बंध लागले होते. मे २०२० मध्ये एक तृतीयांश क्षमतेत तर १८ ऑक्टोबर २०२१ पासून पूर्ण क्षमतेने देशांतर्गत सेवा सुरू झाली. या काळात प्रवासी, टूर ऑपरेटर व बुकिंग कंपन्यांनी बुक केलेली तिकिटे रद्द करावी लागली. डीजीसीएने ७ ऑक्टोबर २०२० रोजी विमान कंपन्यांना एक पत्राद्वारे प्रवाशांचे १००% पैसे परत करण्याचे आदेश दिले. तक्रारींसाठी "एअर सेवा' अॅप सुरू केले. सर्वाेच्च न्यायालयानेही विमान कंपन्यांना रिफंडसाठी आदेश दिला. मात्र, एवढे करूनही पैसे मिळत नसल्याने प्रवाशांना डीजीसीएकडे तक्रारी कराव्या लागल्या.

फ्लाइट प्रॉब्लेमच्या ३८८८ तक्रारी विमानसेवा बंद असल्याने २०२० व २०२१ मध्ये डीजीसीएकडे तक्रारी घटल्या. मात्र २०१९ च्या तुलनेत रिफंडच्या तक्रारी दहापट वाढल्या. २०१९ मध्ये ९०७४, २०२० : ४७६८, २०२१ मध्ये ५३८० तक्रारी आल्या. २०२० मध्ये एकूण तक्रारींपैकी २२३६ (४६.६८%), तर २०२१ मध्ये २२५९ (४१.९८%) रिफंडच्या होत्या. २ वर्षांत सरासरी ४४.१९% तक्रारी रिफंडसाठी आल्या. २०१९ मध्ये ९०७४ पैकी केवळ १९५ (२.१%) रिफंडच्या तक्रारी होत्या. फ्लाइट प्रॉब्लेम ३८८८ (४२%), ग्राहक सेवा २२४६ (२४%) तर बॅगेजसंबंधी २०९१ (२३%) टक्के तक्रारी होत्या.

फाईल फोटो संसदेत नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिलेल्या उत्तरानुसार कोरोनाकाळात देशांतर्गत ७ विमान कंपन्यापैकी सर्वाधिक ८७.७८% तक्रारी एअर इंडिया, स्पाइसजेट व इंडिगोविरुद्ध आहेत. २ वर्षांतील एकूण १०,१४८ तक्रारींपैकी इंडिगोविरुद्ध ९९१ (९.७६%), स्पाइसजेट ११२० (११.०३%), तर एअर इंडियाविरुद्ध ६७९७ (६६.९७%) तक्रारी आहेत. रिफंडसाठी ४५२५ तक्रारी आल्या. पैकी एअर इंडियासंबंधी ४२७४ (९४.४५%) तक्रारी होत्या. कंपनीकडे प्रवाशांचे २५० कोटी रुपये थकले असून ३१ मार्चपर्यंत ते परत करण्याची कंपनीने तयारी दर्शविली आहे.

विमान कंपन्या आणि त्यांच्याविरुद्धच्या तक्रारींचे स्वरूप (सन २०२०/२०२१)
विमान कंपनी भाडे रिफंड उड्डाणासंबधी बॅगेज ग्राहक सेवा वर्तणूक

एअर एशिया 00 66 42 21 32 04
विस्तारा 01 18 03 11 45 13
गो एअर 00 00 190 216 36 00
इंडिगो 00 46 387 246 322 01
स्पाइसजेट 00 00 677 130 104 38
एअर इंडिया 00 4274 594 303 1168 393
ट्रुजेट 00 12 12 06 00 00
अलायन्स एअर 125 69 209 36 00 06
एकूण 127 4525 (44.59%) 2114 969 1698 454

बातम्या आणखी आहेत...