आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑनलाइन शिक्षण:ऑनलाइन शिक्षणासाठी अतिरिक्त शुल्क घेतले असेल तर परत करा, अन्यथा कारवाई; प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळांना सूचना

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण पद्धत वापरु नका

कोरोनामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन आता हळूहळू शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा, शिक्षण हे टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येत असून, त्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र यात पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी आणि पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करु नका. त्याऐवजी टी.व्ही., रेडिओवरील उपलब्ध शैक्षणिक कार्यक्रम दाखवावते, ऐकवावेत अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिल्या आहेत.

जयस्वाल यांनी अशासकीय प्राथमिक शाळांना दिलेल्या सूचना पत्रात म्हटले आहे की, शासनाच्या आदेशानंतरही काही शाळा या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा वापर करत असून, त्यासाठी शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागास प्राप्त झाल्या आहेत. पूर्व वर्ग ऑनलाइन घेणे हे आदेशाचे उल्लंघन आहे. तसेच ज्या शाळांनी ऑनलाइन वर्गाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून वाहतुक शुल्क व ऑनलाइन शिक्षणासाठी अतिरिक्त शुल्क घेतले आहे ते सदर शुल्क संबंधीत पालकांना तात्काळ परत करण्यात यावे. अन्यथा शासन आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी  शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल. असेही शिक्षण विभागाने दिलेल्या सूचना पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...