आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादारू पिऊ देण्यास नकार दिला म्हणून टवाळखोरांनी बारमध्ये घुसून तोडफोड करत राडा घातला. ते एवढ्यावर न थांबता पुढे त्यांनी बारमधील सर्व कर्मचारी, मालकाला मारहाण करत बारवर दगडफेक केली. हा प्रकार ६ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजता वाळूजच्या तंबू बिअरबारमध्ये घडला.राजकुमार मनोहर शिंदे यांचे जोगेश्वरी रोडवर तंबू बिअरबार व हॉटेल आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता त्यांच्याकडे अंकुश आरोडे, अशोक देवबोने, सलमान पठाण, राजा आहिरे दारू पिण्यासाठी गेले. मात्र, व्यवस्थापक हर्षित चक याने त्यांना उशीर झाल्याचे सांगत दारू पार्सल देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर त्यांनी वाद घालत हॉटेलचे कर्मचारी सुमीत कुमार व नाझीम मोहम्मद, रामू कुमार यांना मारहाण करून निघून गेले.
६ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजता टवाळखोर पुन्हा हॉटेलवर गेले. हॉटेलमध्ये घुसून टेबल, खुर्च्या, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रोजेक्टर, स्क्रीनची तोडफोड केली. शिवाय हर्षित व इतरांना मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.