आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेस्ट सेलरची शिकवण:कुणाचा समज काहीही असो आपण सकारात्मक राहावे

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोन मिगेल रूइजच्या “द फोर एग्रीमेंट्स’’ त्या समजाविषयी अाहे, ज्यामुळे अापली क्षमता मर्यादित होते. लेखक पद्धतशीरपणे त्यांचा शोध घेतो आणि आपल्याला आत्म-परिवर्तनासाठी प्रेरित करतो. या पुस्तकाच्या ६५ दशलक्षाहून अधिक प्रती एकट्या अमेरिकेत विकल्या गेल्या आहेत.

करार म्हणजे काय ? आपले लक्ष कधी कराराकडे वेढले जाते, याची आपल्याला जाणीव होत नाही. आपण त्यासोबतच मोठे होतो. आपल्याला चांगल-वाईट, स्वीकार्य आणि अस्वीकार्य यातील फरक सांगितला जातो आणि त्यांच्यानुसार आपण स्वतःला साचेबद्ध करतो. आपण आपला धर्म, नैतिक मूल्ये, भाषा निवडत नाही, हेच इतर करारासोबत होते. त्याविषयी अलर्ट राहायला हवे.

शब्दांची काळजी घ्यावी शब्दात खूप ताकत असते, याचा आपल्याला अंदाज येत नाही. शब्दामुळे कुणाचे आयुष्य बनते तर कुणाचे बिघडते. शब्दांची काळजी घ्यायला हवी, आपण त्यात अडथळा आणतो असा त्याचा अर्थ होत नाही. तर आपण जबाबदारी ठेवुन शब्दांचा वापर करावा, असा त्याचा अर्थ होतो. आपण स्वत:वर किती प्रेम करतो, या पद्धतीनवरुन शब्दाची ताकद जाणून घेता येते.

मनाला लावून घेऊ नये तुमच्या आजू-बाजूला जे घडतेय ते वैयक्तिक घेऊ नये. कोणी तुमच्याशी गैरवर्तन केले तर तो तुमच्याबद्दल नाही तर स्वतःबद्दल सांगतो आहे. तुम्हाला ते मनाला लावुन घेण्याची गरज नाही. मात्र तुम्ही गोष्टी वैयक्तिकरित्या घेता म्हणजे तुम्ही इतरांच्या म्हणण्याशी सहमत आहात. ते फक्त त्यांचे मत आहे, आणखी काही नाही, हे विसरुन जाता.

अंदाज बांधू नये आपल्या सर्वांनाच कल्पना करणे, अंदाज बांधण्याची सवय असते. त्यामुळे ज्या गोष्टी प्रत्यक्षात नसतात त्यावर आपण विश्वास ठेवु लागतो पण त्या फक्त आपल्या डोक्यात असतात. तसेच आपण एखाद्या व्यक्तीबद्दल अंदाज बांधताे तेव्हा नक्कीच गैरसमज तयार होतो.

एकदा स्पष्ट करावे अापण अंदाज का बांधतो ? कारण आपण स्पष्टीकरण मागायला घाबरतो. आपण आधीच विचार करु लागतो की, असं असं झालं असेल, त्याविषयी तपास करत नाही. त्यामुळे नेहमी प्रश्न विचारा आणि अनुमानांचे निदान करा. लक्षात ठेवा, अंदाज बांधणे नेहमीच आपल्याला अडचणीत आणत असतो, कारण तो काल्पनिक असताे.

प्रत्येकाचा विचार वेगळा तुम्ही एखाद्याशी लग्न करायचे ठरवले, पण त्याच वेळी, तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराबद्दल गृहीतक बांधता आणि तो किंवा ती सुसंगत असेल असे गृहीत धरता. यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण हाेते, कारण समोरच्या व्यक्तीची स्वतःची विचारसरणी असते आणि तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करता याची त्याला कल्पना नसते.

बातम्या आणखी आहेत...