आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शन:चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्राॅसिटीचाच गुन्हा नोंदवा ; आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीची मागणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्ये केली. त्यामुळे त्यांच्यावर अॅट्राॅसिटीचाच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीने विभागीय आयुक्तांकडे केली. पाटील यांच्या वक्तव्याविरोधात त्याच दिवशी समितीचे विजय वाहूळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निदर्शने केली होती. सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर दिनकर ओंकार, रमेशभाई खंडागळे, प्रकाश निकाळजे, मिलिंद दाभाडे, अरुण बोर्डे, विजय वाहूळ यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.

विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तत्काळ हकालपट्टी करावी, राम कदम यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, भाजप नेत्यांवर महापुरुष अवमान कायदा व भारतीय दंडसंहिता कलम ५०६ (२) नुसार कारवाई व्हावी.

बातम्या आणखी आहेत...