आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंरोजगाराकडे ओढा:औरंगाबाद आयटीआयमध्ये 1200 जागांसाठी 698 जणांची नोंदणी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था आयटीआय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. राज्यातील १ लाख ३३ हजार जागांसाठी १ लाख ९५ हजार ६५८ विद्यार्थ्यांनी बुधवारपर्यंत प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. १ लाख ७७ हजार ४५४ जणांनी अर्जनिश्चिती केल्याची माहिती औरंगाबाद आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख पी. एस. कुलकर्णी यांनी दिली.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. सध्या प्रवेश नोंदणी प्रक्रिया सर्वत्र सुरू आहे. ४ जुलै रोजी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेला वेग येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. औरंगाबाद आयटीआयमध्ये १२०० जागांसाठी आतापर्यंत ६९८ जणांनी नोंदणी केली आहे. सध्या विद्यार्थी आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करत आहेत. अर्ज फक्त ऑनलाइन भरायचा नाही, तर तो निश्चित करायचा आहे. रोजगारासह स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने आजही दहावीनंतर ग्रामीणसह शहरी भागातील पालक वर्ग आयटीआय अभ्यासक्रमाला पसंती देत असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.