आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निवीर भरतीसाठी 86 हजार युवकाची नोंदणी:आजपासून दररोज 6000 युवक भरतीसाठी येणार - सुनील चव्हाण

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाच्या मैदानावर लष्कराची भरती सुरू आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट दिली असून आजपासून दररोज 6000 युवक भरतीसाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अग्निवीरच्या या भरतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जे लोक जे युवक रिजेक्ट करण्यात आले आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यासाठी जवळपास 12 एनजीओंनी पुढाकार घेतला आहे. दररोज एका एनजीओच्या माध्यमातून या युवकांना जेवण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शहरातल्या एनजीओंची बैठक घेतली होती त्यामध्ये या युवकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार दररोज एका एनजीओच्या माध्यमातून या युवकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये जाईंट्स ग्रुप औरंगाबाद प्राइड तसेच सुदर्शन महाराज आणि ऑल हिंद मल्टीपर्पज सोसायटी यांच्यासह विविध संस्थांच्या माध्यमातुन यामध्ये सहभाग घेतला आहे.

यामध्ये जयपाल रधवा ग्राम विकास संस्थांचे अब्दुल सलमान पठाण, असलम खान ,दानिश खान यांच्या वतीने ही व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.नऊ सप्टेंबर पर्यंत ही भरती प्रक्रिया चालणार असून दररोज 6000 युवक यामध्ये सहभाग होणार आहेत.

रिजेक्ट झाल्यानंतर या युवकांना जेवणाची व्यवस्था दररोज एका संस्थेचा वतीने करण्यात आली आहे ही भरती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात होत आहे.त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पहिल्या दिवशी 1300 जणांनी सहभाग घेतला.तर शनिवार पासून दररोज सहा हजार युवक सहभागी होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले

बातम्या आणखी आहेत...