आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल योजना नको:पुनर्वसन करा, लेबर कॉलनीतील लोकांची मागणी; मलबा हटवण्याचे काम सुरू, दुसरीकडे चोऱ्याही वाढल्या

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेबर कॉलनीतील निर्वासितांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे देण्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. योजनेतून मिळणारी घरे तीनशे चौरस फुटांची असतील. त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. ते आम्हाला परवडणारे नाही. आम्ही कुटुंब चालवायचे की हप्ते भरायचे, असा सवाल करत शासनाने आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

लेबर कॉलनीतील घरे न्यायालयाच्या निकाला नंतर जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केली. त्यामुळे अनेक रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईत लेबर कॉलनी परिसरात तुटलेल्या घरांच्या मलब्याचे ढिगारे पडले आहेत. ते हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चांदणे चौक ते रंगीन दरवाजापर्यंत मोठ्या प्रमाणावर मलबा हटवण्यात आला. हा मलबा खाम नदीच्या बाजूला टाकण्यात येत असल्याचे ट्रॅक्टरचालकांनी सांगितले. कारवाई दरम्यान भंगार, विटा चोरीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे पोलिस तैनात करण्यात आले होते.

रहिवासी पुन्हा घरांकडे : शुक्रवारी सकाळपासूनच अनेक रहिवाशी पडलेल्या घरांच्या मलब्याजवळ येऊन बसले होते. त्यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. अश्रू पुसत ते एकमेकांना धीर देत होते.

बातम्या आणखी आहेत...