आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जोडो यात्रा:तारांकित हाॅटेलमधील ‘प्रेसिडेंट सूट’ नाकारत राहुल एका खोलीत मुक्कामी, एक रात्र औरंगाबादेत मुक्काम

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेला ब्रेक देऊन गुजरातमध्ये प्रचारसभेला गेले होते. तेथून परतताना त्यांचा सोमवारी एक दिवस अौरंगाबादेत मुक्काम होता. त्यांच्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हॉटेल रामामधील व्हीव्हीआयपी प्रेसिडेंट सूट बुक केला होता. मात्र राहुल यांनी या सूटमध्ये राहणे नाकारून याच हॉटेलातील एका साध्या खोलीत मुक्काम करण्यास पसंती दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दररोजचा २५ किमी पायी प्रवास आणि अनेकांशी संवाद साधण्यातून त्यांचा साधेपणा दिसून येतो. कुठे साध्या टपरीवर चहा पिणे, शेतात गावरान जेवणाचा आस्वाद घेण्याचे त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. औरंगाबादच्या त्यांच्या मुक्कामी राहण्यामध्येही साधेपणाचा अनुभव काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आला. राहुल गांधी यांच्या राहण्यासाठी रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये प्रेसिडेंट सूट बुक करण्यात आला होता. त्यामध्ये दोन बेडरूम तसेच लिव्हिंग रूम यासह इतर अनेक विशेष सुविधा आहेत. त्याचे भाडे एका दिवसाला साधारण ४० हजार रुपये इतके आहे. राहुल गांधींना ही निवास व्यवस्था कळवण्यात आली. मात्र त्यांनी ही आलिशान व्यवस्था नाकारत साध्या रूममध्ये मुक्कामाची सोय करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार हॉटेलच्या रूम नंबर ३३२ मध्ये राहुल यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली. त्याचे भाडे साधारणपणे ७५०० रुपये इतके आहे. या रूममध्ये केवळ सिंगल बेडची व्यवस्था आहे. सोमवारी रात्री त्यांनी याच रूममध्ये जेवण मागवले. मंगळवारी सकाळीही इथेच नाष्टा मागवला आणि त्यानंतर सात वाजून ४५ मिनिटांनी ते पुढील भारत जोडो यात्रेसाठी निघून गेले.

जिल्हाध्यक्षांना विचारले, यात्रेत चाललात ना राहुल गांधी यांच्यासोबत हॉटेल रामामध्ये आणि विमानतळावर शहराध्यक्ष युसूफ शेख, जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे होते. या वेळी त्यांनी कल्याण काळे यांना ‘भारत जोडो यात्रेत तुम्ही चालला ना?’ अशी विचारणा केली. त्यावर काळे यांनी आम्ही औरंगाबादचे लोक कळमनुरीमध्ये यात्रेत सहभागी झालो होतोत. त्यानंतर शेगावच्या सभेतदेखील सहभागी झालो होते, असे सांगितले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विमानतळावर राहुल गांधींसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...