आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या भीतीने अंत्यविधीकडे पाठ:अस्थींना नातेवाईकांची प्रतीक्षा; कर्मचारीच करतायत अस्थी विसर्जन

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीड जिल्ह्यात आतापर्यंत 1,933 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

कोरोना काळात मृत्यूनंतर जवळची नाती दुरावली गेलीयेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यात कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. कोणी आपला भाऊ गमावला आहे तर कोणी आपले आई-वडील....

बीड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हाहाकार माजवलाय. आतापर्यंत जिल्ह्यात 84,220 रुग्ण आढळून आलेत. यात 76,900 रुग्ण कोरोना मुक्त तर 1,933 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या दरम्यान मनाला एक चटका लावणारी बाब समोर आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर रुग्णाचे नातेवाईक अंत्यविधीकडे किंवा पाठ फिरवत असून, अस्थी आणि राख घेऊन जाण्यास येत नाहीयेत. यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर नगरपालिकेचे कर्मचारीच अंत्यसंस्कार करत आहेत.

बीड शहरातील भगवान बाबा प्रतिष्ठान इथल्या स्मशानभूमीत अस्थी ठेवण्यासाठी करण्यात आलेले लॉकर देखील आता फुल्ल झाले आहेत. याठिकाणी 15 हून अधिक जणांच्या अस्थी नातेवाइकांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र नातेवाईक अस्थी घेऊन जाण्यासाठी येत नसल्याचे चित्र इथे दिसून येतेय. नातेवाईकांना संपर्क करूनही अस्थी घेऊन जायला संबंधित मृताचे नातेवाईक आले नाही, त्यामुळे या अस्थींचे विसर्जन आणि इतर विधी हे कर्मचारीच करतायत.

कोरोनानाने समजात सुरक्षितता म्हणून अंतर पाडले, उपचार घेण्यासाठी देखील कोरोना बाधित व्यक्तीला वेगळे राहावे लागत आहे. पण, मृत्यूश्चात्य देखील नाते किती दुरावले गेलेत, हेच यावरून दिसून येत आहे. खरंच आपण एवढे कठोर झालो आहोत का.? हा प्रश्न हे सर्व पाहिल्यावर पडल्याशिवाय राहत नाही.

इनपुट- रोहित देशपांडे

बातम्या आणखी आहेत...