आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी मृतदेहाला मुखाग्नी देण्यास दर्शविली असमर्थता, सेनगाव पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिला मुखाग्नी

हिंगोली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले-शैलेश फडसे, मुख्याधिकारी सेनगाव नगर पंचायत

सेनगाव तालुक्यातील कवठा येथील कोविड सेंटरमध्ये एका ६० वर्षाच्या रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी हजेली लावली. मत्र प्रकृतीचेे कारण दाखवत मुखाग्नी देण्यासाठी येत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शेलैश फडसे यांनीच पुढाकार घेऊन मृतदेहाला मुखाग्नी दिला. बुधवारी ता. २८ हा प्रकार घडला आहे.

सेनगाव तालुक्यातील कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेेंटर सुरु करण्यात आले. या ठिकाणी एका साठ वर्षीय व्यक्तीचा आज पहाटे मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळविली. मात्र सकाळपर्यंत त्यांचे कुटुंबिय आले नाही. त्यानंतर अंतसंस्काराची जबाबदारी सेनगाव नगरपंचायतीने स्विकारली.

सेनगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शैलेश फडसे, गटविकास अधिकारी बेले, कर्मचारी विजय हनवते, देवदास सुतार, मिथून सुतार, लक्ष्णम सुतार, बाळु सुतार, विनोद कांबळए यांनी कवठा येथे जाऊन अंत्यविधीची तयारी केली. त्यानंतर आज सकाळी पुन्हा त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना माहिती दिली. सकाळी आठ वाजता त्या व्यक्तीचा एक मुलगा व इतर नातेवाईक कवठा येथे हजर झाले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पुर्तता करून मृतदेह नगरपंचायतीच्या ताब्यात दिला. नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कवठा येथील स्मशानभुमीत नेला. त्या ठिकाणी नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनीच मृतदेह सरणावर ठेऊन मुखाग्नी देण्यासाठी मृतदेहाच्या नातेवाईकाला बोलावले. मात्र त्यांनी प्रकृतीचे कारण सांगत मुखाग्नी देण्यास असमर्थता दर्शविली. स्मशानभुमीत दुर अंतरावरूनच आम्ही अंतिम दर्शन घेतो असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुखाग्नी देण्यासाठी कोणीही नातेवाईक पुढे येत नसल्याने अखेर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनीच पुढाकार घेऊन मृतदेहाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार पार पाडले.

आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले-शैलेश फडसे, मुख्याधिकारी सेनगाव नगर पंचायत

कोविड रुग्णांच्या मृत्यू नंतर त्यांचे अंत्यसंस्कार पार पाडण्याची जबाबदारी नगर पंचायतीवर देण्यात आली आहे. त्यानुसार आज त्या रुग्णाच्या मृत्यू नंतर त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली. मात्र प्रकृती व घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी मुखाग्नी देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे आम्ही मुखाग्नी देऊन आमचे कर्तव्य पार पाडले.

बातम्या आणखी आहेत...