आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरणने कृषी पंपाला वीज जोडणी देण्यासाठी गतीमानता आणली आहे. परिणामी गत दहा महिन्यांत राज्यातील 1 लाख 4 हजार 709 शेतकऱ्यांना वीज दिली. त्यापैकी 54 हजार जोडणी केवळ गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत दिल्या आहेत.
शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून थांबावे लागत असल्याचा पेड पेंडिंगचा प्रश्न गंभीर बनला होता. यामध्ये महावितरण प्रशासनाने लक्ष देऊन पेडिंग अर्ज निकाली काढण्यासाठी मोहिम राबवली. त्यामुळे गतिमान कारवाईला यश येत असून चालू आर्थिक वर्षात नवीन कनेक्शन देण्याच्या बाबतीत एक लाखाचा टप्पा नुकताच ओलांडला, अशी माहिती, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून शुल्क भरल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कनेक्शन मिळण्यासाठी काही वेळ थांबावे लागते. याला पेड पेंडिंगचा प्रश्न म्हणतात. ऊर्जा खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची सूचना महावितरणला दिली होती. महावितरणने गेल्या सहा महिन्यात विशेष नियोजन करून कारवाई सुरू केली आहे.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत सुमारे पन्नास हजार कृषी पंपांना वीज कनेक्शन दिली होती. त्यापेक्षा जास्त कनेक्शन नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या तीन महिन्यात देण्यात आली. महावितरणने पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या नियोजनानुसार कामाला गती आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस 31 मार्च 2023 पर्यंत आगामी दोन महिन्यात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी जोडण्या देण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.