आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपाल भगतसिंह कोश्यारी सतत थोर महापुरुष, त्यांच्या इतिहासाविषयी चुकीचे विधाने करून महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विधानामुळे अघटित घडू शकते, तत्पूर्वी त्यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी वेदांतनगर येथील संकेत सोळुंके यांनी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्यपाल काेश्यारींनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी, महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई यांच्याविषयी जाहीर कार्यक्रमात भाषण करताना अनुद्गार काढले होते. आता मुंबईतील मराठी माणसाविरोधात त्यांनी जीभ घसरली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सोळुंके यांनी केली.
बुलंद छावा संघटनेनेही राज्यपालांचा निषेध केला. मुंबई कष्टकऱ्यांच्या बळावर उभी आहे. मुंबईने सर्वांनाच भरभरून दिले. म्हणून ती भारताची आर्थिक राजधानी आहे हे राज्यपालांना माहिती नाही. मनाला येईल तसे ते बोलत आहेत. शांतता, एकता भंग होण्यापूर्वी त्यांना हटवण्याची मागणी सुरेश वाकडे पाटील, सतीश वेताळ, मनोज गायके, ज्ञानेश्वर जाधव आदींनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
...अन्यथा मराठा समाज रस्त्यावर फिरू देणार नाही राज्यपालांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली आहे. याबद्दल त्यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना रस्त्यावरून फिरू दिले जाणार नाही, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.