आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिकलठाण्याची सकाळ उजाडली ती गुलाबी गणवेशातील आशाताईंच्या घोळक्याने. एका हातात प्रश्नावली आणि दुसऱ्या हातात पत्त्यांंची यादी घेऊन आशाताई प्रत्येक घराचे दार ठोठावत होत्या. पण काही ठिकाणी त्यांना सहज प्रवेेश मिळत होता, तर काही ठिकाणी मुलं घरात नाहीत, गावाला गेली आहेत अशा उत्तरांनी त्यांची बोळवण करण्यात येत हाेती. हद्द म्हणजे, काही ठिकाणी तर कशाला वारंवार दार ठोकता म्हणून त्यांनाच रोषाला सामोरं जावं लागत होतं. हे चित्र होतं, महापालिकेतर्फे चिकलठाणा परिसरातील सावित्रीनगर, हिनानगर या परिसरात सुरू करण्यात आलेल्या गोवरबाबतच्या सर्वेक्षणाचं.
गेल्या सहा दिवसांत शहरात सापडलेल्या सहा संशयित रुग्णांपैकी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. घरीच आयसाेलेशन करून उपचार केलेली ही दोन्ही बालके बरी झाली आहेत. मात्र, कोविड काळात पॉझिटिव्ह रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना आलेल्या कटू अनुभवाचा धसका सगळ्यांनी घेतल्याने गोवरच्या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकाला असहकार्याचा सामना करावा लागत आहे. तरीही, लोकांना समजावून सांगत आशा सेविकांची १२ पथके हे सर्वेक्षण करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.