आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोलाचा सल्ला:रेमडेसिव‍िरचा अनावश्यक वापर टाळल्यास कमी होऊ शकतो तुटवडा; देशासह राज्यातील डॉक्टरांनी व्यक्त केले मत

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेमडेसिव‍िरचा अनावश्यक वापर टाळण्याचा डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांना दिला सल्ला.

राज्यात रेमडेसिविरचा मोठा तुटवडा भासत आहे. यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्येही आरोप-प्रत्यारोप होत असताना देशासह राज्यातील तज्ज्ञांनी रेमडेसिविर ही जादूची कांडी नसल्याचे म्हटले आहे. रेमडेसिविरचा अनावश्यक वापर टाळावा. गंभीर रुग्णांसाठीच याचा वापर केला तर त्याचा तुटवडा भासणार नाही, असे मतही या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

८५% लोकांना रेमडेसिविरची गरज नाही
कोरोनाच्या ८५% रुग्णांना रेमडेसिविर देण्याची गरजच नसते. अधिकांश जणांना केवळ सर्दी, खोकला यासारखी सामान्य लक्षणं असतात. पाच ते सात दिवसांमध्ये त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होते. केवळ १५ % रुग्णच असे असतात ज्यांचे इन्फेक्शन गंभीर स्वरूपाचे असते. त्यामुळे रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचे व्यवस्थित नियोजन केले तर त्याची कमतरता किंवा तुटवडा भासणार नाही. - डॉ. रणदीप गुलेरिया, एम्स रुग्णालयाचे संचालक.

रेमडेसिविर हा रामबाण उपाय नाही
कोरोना झाल्यावर गंभीर त्रास होतोय अशांनाच रुग्णालयात दाखल करावे. रेमडेसिविर इंजेक्शनाबाबत आपल्याला एक प्रोटोकॉल बनवावा लागेल. टेस्ट रिझल्ट, लक्षणं, आधीपासून रुग्णाला असलेले आजार या साऱ्यांचा पुरेपूर विचार करूनच डॉक्टरांनी रेमडेसिविर देण्याचा विचार करावा. हे काही रामबाण औषध नाही. यामुळे केवळ व्हायरलचा प्रभाव कमी होतो. - डॉ. नरेश त्रेहन, मेदांता रुग्णालय.

सरसकट व तर्कशून्य वापर टाळा
रेमडेसिविर हे कोविडच्या उपायांमध्ये संजीवनी नाही. संसर्ग झाल्यावर दुसऱ्या दिवसापासून ९ व्या दिवसापर्यंत त्याचा योग्य वापर झाला तरच उपयुक्त. रेमडेसिविरच्या वापराबाबत अनाठायी भीती अाणि वर्तन टाळा. आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा. त्यांच्या सल्ल्याचा आदर करा. रेमडेसिविरचा सरसकट आणि तर्कशून्य वापर टाळा. - डॉ. संजय ओक, कोविड टास्क फोर्स, महाराष्ट्र

रेमडेसिविर जादूची कांडी नाही
हे इंजेक्शन प्रत्येक रुग्णाला उपयुक्त नाही. मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य वेळी, योग्य मात्रेत जास्तीत जास्त ५ दिवस तेही संसर्गाच्या पहिल्या ९ दिवसांतच ते देण्याचे नियम आहेत. काही ठिकाणी ते पाळले जात नाहीत. याचा अतिरेकी व अतर्किक वापर उपयोगाचा नाही. सध्याच्या वैद्यकीय आणीबाणीत त्याचा वापर केला जात आहे, मात्र याचे काही साइड इफ़ेक्ट्सही असू शकतात हेही लक्षात घेतले पाहिजे. - मंजिरी घरत, औषधशास्त्र अभ्यासक

बातम्या आणखी आहेत...