आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसक्या आवळल्या:​​​​​​​तक्रारदारानेच कॉल करून बोलावले अन् चढ्या दराने रेमडेसिविर विकणाऱ्या चौघांना पकडले

नांदेडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नांदेडात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तुटवडा

मराठवाड्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक झाला आहे. रुग्णांना जीवदान मिळावे म्हणून प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मागील काही दिवसांपासून नांदेडमध्ये कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळ्या बाजारात याची विक्री करण्याचे प्रकार वाढले होते. यासंदर्भात तक्रारी वाढल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी कारवाई करत इंजेक्शनचा काळा बाजार करणारे रॅकेट पकडले. मूळ किंमत ५,४०० असताना आठ हजार रुपयांना रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या ४ जणांना ताब्यात घेण्यात आले. तक्रारदार तरुणाच्या माध्यमातून शिवाजीनगरला बोलावून औषधाचा व्यवहार करायला लावला आणि सापळा रचून पकडले.

नांदेड जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नातेवाइकांना पूर्ण शहरभर धावपळ करावी लागत असल्याचे चित्र आहे. इंजेक्शन अव्वाच्या सव्वा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. दरम्यान, कोरोना झालेल्या रुग्णाचे नातेवाईक गौतम नरसिंगदास जैन (रा. हनुमानपेठ, नांदेड) हे स्थानिक गुन्हे शाखा येथे बुधवारी आले होते. त्यांनी इंजेक्शनची मूळ किंमत ५४०० असताना ८ हजारांना विकले जात असल्याची तक्रार त्यांनी केली. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना कारवाईच्या सूचना दिल्या. तक्रारदार गौतम यांच्या मोबाइलवरून कॉल करून चढ्या दराने इंजेक्शन विकणाऱ्यांना शिवाजीनगरातील डॉक्टर लाइन येथे बोलावण्यात आले. सहायक पोलिस निरिक्षक पी.डी. भारती, पोलिस नाईक गंगाधर कदम, बालाजी तेलंग, गणेश धुमाळ यांच्या पथकाने चौघांना पकडले.

सात इंजेक्शन केले जप्त
वीरभद्र संगाप्पा स्वामी (२६, व्यवसाय मजुरी, रा. शिरूर, ता. अहमदपूर), बाबाराव पडोळे (२५, हिंदुस्थान मेडिकल वाजेगाव, नांदेड.), बालाजी भानुदास धोंडे (३४, मेडिकल व्यावसायिक, नांदेड), विश्वजित कांबळे ऊर्फ बारडकर (३६, व्यवसाय एमआर, रा. बारड.) यांना शिवाजीनगर डॉक्टर लाइन भागातून ३६ हजार ४०० रुपये किमतीचे सात इंजेक्शन जास्त दराने विकताना त्यांना ताब्यात घेतले. शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पुरवठा, वितरणासाठी २ अधिकारी
रेमडेसिविरच्या साठा व पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अर्धापूरचे तहसीलदार सुजित नरहरे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त रोहित राठोड यांंची नियुक्ती केली आहे. औषध दुकानावरून थेट रेमडेसिविर औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात येत असून रेमडेसिविर औषधाचा पुरवठा स्टॉकिस्टद्वारा केवळ कोविड हॉस्पिटल, हॉस्पिटलला संलग्न असलेल्या फार्मसीत करण्यात यावा, असे आदेश काढले. बुधवारी ४३ कोरोना सेंटरला स्टॉक पाठवला आहे.

हिंगोली : रोज १५० इंजेक्शन
सध्या शासकीय रुग्णालयात एक हजार इंजेक्शन उपलब्ध आहेत. दररोज १२५ ते १५० इंजेक्शन वापरले जातात. शासकीय रुग्णालयाने आरोग्य संचालक कार्यालयाकडे सहा हजार इंजेक्शनची मागणी नोंदवली आहे. तसेच स्थानिक पातळीवर ५ हजार इंजेक्शन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

परभणी : तुटवडा नाही
जिल्ह्यात सध्या ४०० रेमडेसिविर उपलब्ध आहेत. दोन हजार इंजेक्शनची मागणी नोंदवण्यात आली आहे. लातूरच्या पुरवठादाराकडे ४०० इंजेक्शन मागवले आहेत. दररोज २०० रेमडेसिविर इंजेक्शन वापरले जात आहेत. जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

लातूरमध्ये एचआरसीटी वाढल्याने वापर वाढला
लातूर : उदगीरमध्ये रेमडेसिविर मिळेना
जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिविरच्या पुरवठा व िवतरणाबाबत टीम तयार केली अाहे. काेविड सेंटरच्या जवळील मेडिकलमध्ये इंजेक्शन देण्याचे अादेश देण्यात अाले. जिल्ह्यातील २८ सेंटरवर तुटवडा जाणवत अाहे. जिल्ह्यात तुटवडा जाणवत असून उदगीरमध्ये इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी अाहेत. रुग्णांची एचअारसीटी करण्याचे प्रमाण वाढले असून रेमडेसिविरचा वापरही वाढला अाहे.

जालना : येत्या दाेन दिवसांत तुटवडा जाणवण्याची शक्यता
जिल्ह्यात ९०० ते १००० हजार एवढी रेमडेसिविर इंजेक्शनची दैनंदिन गरज आहे. प्रत्यक्षात ७०० इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. गंभीर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या दोन-तीन दिवसांत आणखी तुटवडा निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यातील २५ काेराेना रुग्णालयांशी संलग्नित मेडिकलमध्येच हे इंजेक्शन उपलब्ध केले अाहे. तसेच १४०० रुपये दरानेच याची विक्री करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

उस्मानाबाद : उसनवारीवर खासगीत इंजेक्शनचा पुरवठा
जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात जाणवला. हा तुटवडा केवळ खासगी रुग्णालयातच निर्माण झाला होता. जिल्हा रुग्णालयात इंजेक्शनचे १२०० डोस उपलब्ध आहेत. आणखी ४ हजार ५०० डोसची मागणी केली अाहे. शनिवारी व रविवारी जिल्हा रुग्णालयातून उसन्या स्वरूपात खासगी रुग्णालयांना रेमडेसिविर पुरवण्यात आले. सोमवारी १५२, तर मंगळवारी २०२ व्हायल उपलब्ध झाल्या.

बातम्या आणखी आहेत...