आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:रेमडेसिविर चोर अफरोजने मृताचे 36 हजार लाटले?; जालना पोलिसांना संशय; सखोल चौकशी करणार

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंजेक्शन चोरीला गेल्याचे वर्तमानपत्रातून कळले

जालन्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून रेमडेसिविर चोरून विकणाऱ्या सात जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अफरोज इक्बाल खान (२२) हा जालना पोलिसांनादेखील चोरीच्या गुन्ह्यात हवा आहे. त्याने मृत रुग्णाचे ३६ हजार रुपये चाेरल्याचा संशय असून या प्रकरणात पाेलिस त्याची चाैकशी करणार अाहेत. दरम्यान, मंगळवारी अटक केलेल्या अाराेपींना काेर्टाने बुधवारी पाेलिस काेठडी सुनावली.

जालन्याच्या रुग्णालयात १५ एप्रिल रोजी कचरू मानसिंग पिंपराळे यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांच्याजवळील ३६ हजार रुपये, कागदपत्रे, अंगठ्या, मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात अाले. पिंपराळेंचा मृत्यू झाला तेव्हा अफरोज तिथे कामाला हाेता. या चोरीत त्याचा हात असावा, असा संशय कदीम ठाण्यातील पोलिसांना आहे. पिंपराळे यांच्या मृतदेहाचे फिंगरप्रिंट वापरून मोबाइल सुरू करून फोन पे अॅपवरून ६,८०० रुपये खात्यातून काढून घेण्यात अाले. या प्रकरणात पोलिसांनी मोमीन मोहसीन मोमीन नसीर (रा. जालना) याला अटक केली आहे. सायबर पोलिस त्याचा तपास करीत आहेत. रेमडेसिविर प्रकरणात पकडलेले जालन्याचे चाैघे मोमीनसोबतच काम करतात, अशी पाेलिसांना माहिती मिळाली. त्यामुळे कदीम पोलिसांनी अफरोजची चाैकशी करण्यासाठी अाैरंगाबाद पाेलिसांशी संपर्क साधला.

इंजेक्शन चोरीला गेल्याचे वर्तमानपत्रातून कळले
जालन्यातील शासकीय रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शन चोरीला गेल्याची माहिती तेथील रुग्णालय प्रशासनाला नव्हती. २८ एप्रिल रोजी गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईचे वृत्तांकन वर्तमानपत्रात आले. त्या वेळी जालन्यातील रुग्णालयातून इंजेक्शन चोरीला प्रशासनाला कळले. औरंगाबादेतील शासकीय रुग्णालयातूनही इंजेक्शन चोरीला गेले. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपींनी जेलमधून सुटून पुन्हा हा गोरखधंदा सुरू केल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...