आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी टिप्पणी:छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याआधी इतिहासाचे धडे लक्षात ठेवा

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरे झालं आता. आणखी किती अपमान करणार तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे. तुम्ही म्हणतात तसे ‘पुराना काळ’मध्ये होते. आजच्या काळातही आहे. आणि कान उघडे ठेवून ऐकून घ्या. येणाऱ्या काळातही राहतीलच. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला तर मराठी माणूस पेटून उठेल, अवघा महाराष्ट्र पेटून उठेल. कधी काळी दिल्लीच्या बादशहाने छत्रपती शिवाजी महाराजांसमोर एक शाहिस्तेखान पाठवला होता. आजही त्याची छाटलेली बोटं पुण्यामध्ये कुठेतरी सापडतील. अपमानित होऊन त्याला महाराष्ट्रातून पळून जावं लागलं होतं. आजही महाराजांची प्रतिमा संपवायला कुणी शाहिस्तेखान निघाला तर महाराष्ट्र सहन करणार नाही. जर दिल्लीच्या बादशहाने शाहिस्तेखानाला वेळेवर परत बोलावून घेतले असते तर होणारी नामुष्की टाळता आली असती. इतिहास धडे शिकवत असतो, राज्यपालांनी इतिहास सांगतेवेळी त्यातील धडे लक्षात ठेवले तर बरे होईल.

बातम्या आणखी आहेत...