आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरण:आपल्या वंशावळ नोंदी जतन करून पूर्वजांना स्मरणात ठेवू

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वजांचे स्मरण करून त्यांना तृप्त करणे व संपूर्ण कुटुंबीयांसाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त घेणारा पक्षपंधरवडा अंतिम टप्प्यात आहे. २५ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावास्येला या पंधरवड्याची सांगता होईल.

पूर्वजांचे सुसंस्कार, त्यांनी घालून दिलेल्या चालीरीती, परंपरा आपण वर्षानुवर्षे जपत असतो.पितरांचे पूजन करताना तीन पिढ्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. दिवंगत आई-वडील, आजी- आजोबा व पणजी-पणजोबा यांच्या नावाने पिंडदान केले जाते. पण अनेकांना तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या पिढीची नावेच माहिती नसतात. त्यामुळे या पक्षपंधरवड्याच्या निमित्ताने पूर्वजांची नावे जाणून घेऊन वंशावळीची साखळी दस्तएेवजाच्या स्वरूपात तयार करावी, असे आवाहन ‘दिव्य मराठी’तर्फे करण्यात येत आहे. यातून पुढच्या पिढीलाही आपल्या पूर्वजांबाबत माहिती होईल.

बातम्या आणखी आहेत...