आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत दुकानाचे बांधकाम थांबविले:औरंगाबादच्या रशिदपुरा ,शताब्दीनगर ,जुबली पार्क घाटी परिसरातील अतिक्रमणे काढली

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी 15 अतिक्रमणे हटवले. यात रशिदपुरा ,शताब्दी नगर ,जुबली पार्क घाटी परिसरातील अतिक्रमणाचा समावेश आहे. शताब्दी नगर परिसरात ऐतिहासिक दरवाजा लगत अनधिकृत 12 बाय 15 जागे मध्ये पत्रे टाकून लोखंडी शटर बसविण्यात आले होते. किरकोळ साहित्य विक्री करण्यात येत होती. संबंधितास नोटीस सूचना देण्यात आल्या होत्या. तरी देखील सबधितांनी अनधिकृत बांधकाम काढले नव्हते. त्यामुळे अतिक्रमण पथकामार्फत कारवाई करण्यात आली.

जुबली पार्क घाटी परिसर या ठिकाणी काही नागरिकांनी लोखंडी शटर बसवून टपऱ्या टाकल्या होत्या. तर काहींनी चारचाकी हातगाड्या लावून अतिक्रमण केले होते. या सर्व अतिक्रमण धारकाविरुद्ध जेसीबी च्या साह्याने कारवाई करण्यात आली. यामध्ये दोन लोखंडी टपऱ्या व किरकोळ साहित्य जप्त करून नियमानुसार दंड आकारण्यात आला आहे. तसेच जुबली पार्क रस्त्यावर पाच बाय पाच आकारामध्ये शेड टाकून दुकाने थाटली होती. ती निष्कासित करण्यात आली आहे.

बिबी बिबी का मकबरा रोड पहाडसिंगपुरा या ठिकाणी शेळके यांचे अनधिकृतपणे दुकानाचे बांधकाम सुरू होते, ते बांधकाम थांबवून संबंधित बांधकाम धारकांना नोटीस देण्यात आली आहे. वाहतुकीला अडथळा करणारे आणि रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाई नेहमीच सुरू राहील, असे अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांनी सांगितले. अधिकारी वसंत भोये इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, पंडित गवळी व मनपा पोलीस पथक यांनी कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...