आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहागंज भाजीमंडईत व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून रस्ता अडवला होता. रस्त्यावरच १० बाय १० आणि १० बाय १५ आकाराचे पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण केले होते. परंतु, मनपा अतिक्रमण विभागाने मंगळवारी हे सर्व अतिक्रमण हटवून ५० फुटांचा रस्ता मोकळा केला. शहागंजचा मुख्य रस्ता, दुर्गाप्रसाद आरोग्यधाम दवाखान्यापासून अतिक्रमणे हटवली. नागरिकांनी शेड आणि जमिनीलगत सिमेंटचे ओटे बांधून अतिक्रमण केले होते. यामुळे हा रस्ता ५० पैकी केवळ १० फूट शिल्लक राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. सर्व अतिक्रमणे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली. सुरुवातीला काही व्यापाऱ्यांनी कारवाईला विरोध केला. मात्र, त्यांच्या विरोधाला न जुमानता सिटी चौक येथील पोलिसांना बोलावून अतिक्रमण काढले. एकूण ५० अतिक्रमणधारक होते. यात ड्रायफ्रूट विक्रेते, चिकन आणि बकरा मटण, भाजी विक्रेत्यांचा समावेश होता.
फिश मार्केटने घेतला मोकळा श्वास : मनपाने या भागात सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय फिश मार्केट तयार केले आहे. या फिश मार्केटलगतही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली होती. ती पूर्णपणे जेसीबीच्या साह्याने निष्काषित करून फिश मार्केट परिसर पूर्ण मोकळा केला.
हिंदी महाविद्यालयासमोरील अतिक्रमणे हटवली महाराष्ट्र हिंदी विद्यालयाजवळील अंदाजे ३० बाय १० दुकान निष्कासित केले. शाळेभोवती दुकानाचे अतिक्रमण केले होते. नेहमीच विद्यार्थी व पालकांना त्रास सहन करावा लागत होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.