आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन करण्याचा इशारा:हडको परिसरातील अतिक्रमण हटवा, पाणीपुरवठा सुरळीत करा : मनसे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हडको परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. त्यावर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. हडको-सिडको परिसरात सात दिवसांआड पाणी येत आहे, तो पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात यावा, अन्यथा जी-२० बैठकीनिमित्त येणाऱ्या पाहुण्यांच्या समोर दहा बाय दहाचे अतिक्रमणांचे फोटो काढून शहरभर शंभर होर्डिंग लावून मनसे स्टाइल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेच्या वतीने मनपा प्रशासकांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

संघटनेचे मध्य मतदारसंघाचे विभाग अध्यक्ष चंदू नवपुते यांच्यासह शिष्टमंडळाने सोमवारी मनपा प्रशासकांची भेट घेतली. या वेळी जिल्हा सरचिटणीस नीरज बरेजा, शहर उपाध्यक्ष सुरेंद्र वाडेकर उपस्थित होते. मनसेने प्रशासकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हडको भागात सध्या सात दिवसांनंतर पाणी दिले जाते. त्यातही केवळ वीस मिनिटेच पाणीपुरवठा करण्यात येतो. कमी दाबाने पाणी येत असल्याने, सात दिवस पुरेल एवढे पाणी साठवताही येत नाही. महापालिकेकडून नियमित करवसुली केली जाते, त्याचप्रमाणे नियमित पाणी मिळावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

जळगाव रोड ते टीव्ही सेंटर चौक, हडको कॉर्नर ते टीव्ही सेंटर, ग्रामीण पोलिस मुख्यालय ते टीव्ही सेंटर या रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी फूल विक्रेते, फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांनी अतिक्रमणे केली आहेत. कुणी व्हीआयपी येणार असला तरच ही अतिक्रमण काढली जातात आणि पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते. यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. ही सर्व अतिक्रमणे त्वरित काढावीत, अन्यथा या अतिक्रमणांचे फोटो काढून शहरभर शंभर होर्डिंग्ज लावण्यात येतील, अशा इशाराही निवेदनात देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...