आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोर महापुरूषांबद्दल चुकीचे विधान करणाऱ्या राज्यपालांना हटवा:एमआयएमचे क्रांती चौकात राज्यपाल गो बॅकचे निदर्शने

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज जगाचे आदर्श, महाराष्ट्रासह भारताची शान आहेत. याचे भान राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांना नसावे, हे खेदजनक आहे. अशा व्यक्तीला संविधानिक पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना त्वरीत हटवण्यात यावे. तसेच भाजपला सत्तेतून पायउत्तर करून देश वाचवावा, अशी हाक एमआयएमच्या वतीने बुधवारी देण्यात आली. राज्यपाल गो बॅक, भाजप हटाव देश बचाव, या घोषणांनी क्रांती चौक दणाणून गेला होता.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतुलनीय व वंदनीय आहे. त्यांची तुलना आताच्या नेत्यांशी अजितबात होऊ शकत नाही. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी तो केविलवाना प्रयत्न करून मंत्री नितीन गडकरी यांची तुलना केली. थोर महापुरुषांबद्दल ऐकरी नावाचा उल्लेख करणे अशोभनीय व असंसदीय असल्याचे नासेर सिद्दीकी यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. त्यांना हटवण्यात यावे, अशी मागणी सर्वस्तरातून होत असताना भाजप सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. याच्या निषेधार्थ आणि राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव, भाजपाला सत्तेतून पायउत्तार करावे, यासाठी आम्ही निदर्शने करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर हातात पोस्टर्स घेऊन एमआयएम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यपाल गो बॅक, भाजप, आरएसएसच्या समाजविरोधी मानसिकेते विरोधात जोरदार निदर्शने दिली. शाहरूख नसबंदी, फेरोज खान, आरएफ हुसेनी, शेख अहेमद, रफिक चित्ता, समीर साजीद यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी आंदोलनात सहभागी झाले होते.

पोस्टर्सवरील स्लोगन लक्षवेधी

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे नाही तर देशाची शान आहे. त्यांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. गो बॅक गव्हार्नर गो बॅक आदी स्लोगन पोस्टर्सवर लिहिली होती ते लक्षवेधी ठरले.

शिवराय सर्वांचेच

शिवरायांनी कधीच जातीभेद केला नाही. त्यांच्या सारखा आदर्श जनता राजा होणे नाही. अठरापगड मावळ्यात विश्वासू सरदार व मावळे मुस्लिम होते. त्यामुळे शिवराय हे सर्वांचेच आहे. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. असे फेरोज खान म्हणाले. आम्ही शिवरायांचा आश्वरूढ पुतळा तातडीने बसवा, यासाठी आंदोलन केल्याचे सांगितले.

शिवरायांचा केला जय घोष

एमआयएमच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जय कार केला. नंतर राज्यपाल व भाजप विरोधात तीव्र निदर्शने दिली.

बातम्या आणखी आहेत...