आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदाधिकाऱ्यांची मागणी:महापुरुषांबद्दल सातत्याने चुकीचे विधान करणाऱ्या राज्यपालांची हकालपट्टी करा

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठातील कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पुन्हा एकदा चुकीचे विधान केल्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो. महापुरुषांचा वारंवार अपमान करणाऱ्या अशा राज्यपालांची हकालपट्टी करावी, अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होईल, असा इशारा विविध मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारला दिला आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज काल, आज आणि उद्याही सर्वांचेच श्रद्धास्थान राहतील. त्यांच्याविषयी सातत्याने चुकीचे विधान करणाऱ्या आऊटडेटेड झालेल्या राज्यपालांना त्वरित हटवण्यात यावे. त्यांच्या चुका पाठीशी घालू नयेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात उद्रेक होण्यापूर्वी तातडीने पाऊल उचलावे.’

मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक माणसाच्या नसानसात भिनलेले आहेत. सर्वांसाठी ते देव आहेत. त्यांच्याविषयी एकेरी उल्लेख करणे अशोभनीय आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगाच्या पाठीवर सर्वोत्कृष्ट आणि लोककल्याणकारी असे स्वराज्य निर्माण केले. कोणाचीही त्यांच्याशी तुलना होऊच शकत नाही. राज्यपाल जाणीवपूर्वक वादग्रस्त विधान करीत असतात. त्यांनी शिवप्रेमींची माफी मागावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाइलने धडा शिकवला जाईल.

बातम्या आणखी आहेत...