आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक तारखेला काढणार आरक्षण:खुलताबाद नगरपरिषद आरक्षण नव्याने काढा; निवडणूक आयोगाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुचना

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद ("क" वर्ग) नगरपरिषदेची अनुसूचित जातीची सोडत राज्य निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या विहीत प्रक्रियेनुसार झालेली नाही. त्यामुळे खुलताबाद नगरपरिषदेकरिता आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सुचना देण्यात आले आहे.

आयोगाने दिलेल्या आरक्षण व सोडतीच्या कार्यक्रमानुसार खुलताबाद नरिषदेच्या प्रभागातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची एकूण लोकसंख्येशी असलेली टक्केवारी न घेता अनावधानाने अनुसूचित जातीची लोकसंख्या विचारात घेऊन आरक्षण काढण्यात आले. जे चुकीचे झाले आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने अनुसूचित जाती व त्यामधील महिला सर्वधारण प्रवर्गातील महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यात यावे अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मात्र अनुसूचित जमातीचे आरक्षण राज्य निवडणूक आयोगाच्या 09/06/2022 रोजीच्या आरक्षण व सोडतीच्या कार्यक्रमानुसार यापूर्वीच निश्चित झालेले असल्यामुळे आता अनुसूचित जमातीसाठी पुन्हा सोडत काढण्याची आवश्यकता नाही.

एक तारखेला काढणार आरक्षण

आयोगाने एक तारखेला आरक्षण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सदस्य पदच्या आरक्षण करिता 30 जूनला नोटीस प्रसिध्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत