आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश:बंगळुरूसारखी पूरस्थिती होऊ नये म्हणून नाल्यावरची अतिक्रमणे काढा

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाने पाणी तुंबून राहणाऱ्या शहरातील सर्व जागा आणि नाल्यांचे सर्वेक्षण करा, बंगळुरूसारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणून नाले मोकळे करा, असे निर्देश सोमवार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अरुण पेडणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

वाळूजमध्ये कंपन्यांच्या पाइपसमोरच लोकांनी अतिक्रमणे करून जागा अरुंद केल्याने सांडपाणी वाहून जाण्याऐवजी साचून राहते. त्यामुळे वाळूज औद्योगिक वसाहतीतील कॉस्मो कंपनीचे प्रतिनिधी योगेश प्रल्हाद खडकीकर यांनी याचिका दाखल करून अतिक्रमण काढण्याची विनंती केली होती. यापूर्वी झालेल्या सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे सादर करत नाल्यावरील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात केलेल्या उपायांची माहिती दिली. तसेच त्यांनी याचिकाकर्त्यांना अतिक्रमणांच्या मोजणीसाठी १२ हजार रुपये भरण्यास सांगितले. कॉस्मोकडून अॅड. व्ही. डी. सपकाळ यांनी वेळेत आणि वेगाने काम कसे होईल, असा प्रश्न उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...