आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चा:‘राज्यपाल हटवा, अन्यथा राजभवनावर मोर्चा काढू’ ; शिवसेना, मनसेची निदर्शने

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अक्षेपार्ह विधान केले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. रविवारीही त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले. क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चाने शिवद्रोही राज्यपालांना त्वरित हटवा, अशी मागणी करत जोरदार निदर्शने करून राजभवनावर माेर्चा काढण्याचा इशारा दिला. शिवसेना, मनसे, विद्यार्थी संघटनांनीही आंदाेलन केले.

मराठा क्रांती माेर्चाच्या सदस्यांनी राज्यपालांच्या प्रतिमेस काळे फासून व चपला-जोडे मारो आंदोलन केले. या वेळी चंद्रकांत भराट, सुनील कोटकर, नीलेश डव्हळे, नंदू गरड, गणपत म्हस्के आदींची उपस्थिती हाेती. दुसरीकडे विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चाैकात आंदाेलन करण्यात आले. मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्या उपस्थितीत टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमाेर आंदाेलन करून राज्यपालांना हटवण्याची मागणी करण्यात आली, तर विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर समविचारी विद्यार्थी संघटनांनी राज्यपालांचा पुतळा जाळून निषेध नाेंदवला. या वेळी दीक्षा पवार यांनी राज्यपाल औरंगाबादेत आले तर त्यांची गाडी फोडण्याचा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...