आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळाव्याला प्रतिसाद:वंजारी समाजाला एनटीमधून काढून ओबीसीत सामावून घ्या : ज्ञानोबा मुंडे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वंजारी समाजाला वर्ष १९९३ मध्ये ओबीसीमधून काढून एनटी-डी या स्वतंत्र प्रवर्गात समावेश केला होता. त्यावेळी केलेला तो बदल योग्य होता. मात्र, आता एनटीमधील आरक्षणाची अत्यल्प असलेली टक्केवारी समाजासाठी फार उपयोगी राहिलेली नाही. त्यामुळे वंजारी समाज आता एनटीमधून काढून पुन्हा ओबीसीमध्ये टाकावा, अशी मागणी भाजपचे नेते भाई ज्ञानोबा मुंडे यांनी केली. औरंगाबादमध्ये वंजारी भवनमध्ये आयोजित राज्यस्तरीय विचारमंथन मेळाव्यात मुंडे बोलत होते.

माजी आमदार नारायणराव मुंडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी नवनाथ महाराज आंधळे, माजी सनदी अधिकारी भास्कर मुंडे, गोपीचंद चाटे, सूर्यकांत अंबरवाडीकर, डॉ. विजयकुमार फड, प्रवीण घुगे, कांचनकुमार चाटे, डॉ. अशोक बांगर, रावसाहेब घुगे, डॉ. रोहिदास मुंडे, डॉ. उज्ज्वला दहिफळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी भाई मुंडे म्हणाले, समाजासाठी समाजातील दात्यांच्या मदतीतून वंजारी भवनची वास्तू उभी राहिली. आता यापुढे शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्याचा विचार आहे. प्रवीण घुगे म्हणाले, समाजातील तरुणांनी उच्चशिक्षित झाले राहिजे. उच्चशिक्षित होऊन एकसंध राहण्यात समाजाचा फायदा आहे. समाजातील तळागाळातील लोकांना पुढे आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. कांचनकुमार चाटे म्हणाले, समाज सध्या राजकीय अस्थिरतेतून जात आहे. समाजातील नेते एकत्र राहिले तर समाजही कायम एकत्र राहील. कोण मोठा, कोण छोटा हा विचार कोणी करू नये. या वेळी इतर मान्यवरांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...