आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:‘सीएचबी’चे मानधन 650 वरून 900 रुपये : पाटील

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयातील रिक्त जागा डिसेंबरपर्यंत भरण्यात येतील. २०८८ जागा भरल्यानंतर आढावा घेऊन उर्वरित जागा भरण्यासही मान्यता देऊ, पण तूर्त ‘सीएचबी’ प्राध्यापकांचे मानधन ६५० वरून ९०० रूपये प्रति तास करणार आहोत. त्याचा निर्णय झाला असून लवकरच अमलात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महात्मा फुले सभागृहात पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कृषी विद्यापीठांमध्ये ६५ हजार विद्यार्थी शिकण्याची क्षमता आहे. यंदा त्यातील २८ हजार प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे कृषी संस्थांची आता गरज नाही, असे दिसते. रासेयोच्या स्वयंसेवकांची नोकरीत भरती करण्याबाबात आम्ही विचार करत आहोत. सीएचबी प्राध्यापकांचे मानधन ६५० वरून ९०० केले की, आपोआपच त्यांचे मानधन नियमित प्राध्यापकांच्या वेतनाएवढे होईल. बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या फेलोशिपमध्ये आम्ही समानता आणण्याचा प्रयत्न करू.’

आता विद्यापीठात दीक्षांत समारंभ होणार नाहीत पाटील म्हणाले, ‘चार वर्षांचा अभ्यासक्रम करता येणार असल्यामुळे विद्यार्थ्याला विविध विषय एकाच पदवीसाठी निवडता येतील. त्याला त्याचे क्रेडिट स्कोअर डिजी लॉकरमध्ये जमा होतील. तो कुठल्याही वर्षी बाहेर पडू शकतो अन् पुन्हा आत येऊ शकतो. ज्या दिवशी तो पदवी पूर्ण करेल त्याच दिवशी त्याचे पदवी प्रमाणपत्र त्याच्या डिजी लॉकरमध्ये येऊन पडेल. त्यामुळे यापुढे दीक्षांत समारंभ घेण्याची गरजच पडणार नाही.’

बातम्या आणखी आहेत...