आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज जागतिक सूर्य दिन:अक्षय्य सौरऊर्जा; एकदा यंत्रणा बसवल्यानंतर 3 वर्षांतच पैसे वसूल, पुढे मोफत वीजपुरवठा

औरंगाबाद | महेश जोशी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघा महाराष्ट्र उष्णतेची लाट व भारनियमनामुळे होरपळत आहे. याउलट सौरऊर्जेसारख्या ऊर्जा स्रोतांचा अवलंब केल्यास पर्यावरण संवर्धनासह खिशावरील भारही हलका होऊ शकतो. महिन्याकाठी सरासरी ३६० युनिटसाठी वार्षिक ५० हजारांचे बिल भरण्यापेक्षा एकदाच १.२५ लाख रुपये खर्चून सौरऊर्जेची यंत्रणा बसवणे किफतायशीर ठरते. ३ वर्षांत गुंतवलेला पैसाही फिटून जातो. यंत्रणेसठी ४० टक्क्यांपर्यंत अनुदानही मिळू शकते. राज्यात २०१७-१८ पर्यंत महाऊर्जाच्या (मेडा) माध्यमातून सौरऊर्जेसंबंधी योजना राबवल्या जात. नंतर महावितरणकडे जबाबदारी गेली.

महाराष्ट्राची सद्य:स्थिती
११.५ कोटी लोेकसंख्येच्या महाराष्ट्रात २.७३ कोटी ग्राहकांना दररोज सरासरी २३,६०० ते २४ हजार मेगावॅट वीज लागते. महानिर्मितीची उत्पादन क्षमता ९ हजार मेगावॅटहून अधिक आहे. कोळसा टंचाईमुळे सध्या वीजनिर्मिती घटली आहे. शेजारील गुजरातमध्ये लॉकडाऊन काळात महाराष्ट्रापेक्षा दुप्पट सौरऊर्जेचे उत्पादन झाले. २०२० व २०२१ मध्ये महाराष्ट्रात ४,०९० मेगावॅट सौरऊर्जेची निर्मिती झाली. याच काळात गुजरातने ७,३७९.१९ मेगवॅटची निर्मिती केली.

तीन वर्षांत बिलमुक्ती : तीन वर्षांचे वीज बिल रु. १,५५,८५० येते, तर सौर पॅनल बसवण्याचा खर्च १,५०,००० रुपये आहे. म्हणजेच साधारणपणे ३ ते ३.५ वर्षांत गुंतवलेला खर्च निघतो.

सौर पॅनल बसविण्याचा खर्च
प्रतिकिलोवॅट ~42,020 x 3 किलोवॅट = 1,26,060
लोखंडी फ्रेम आदी-24,000 । एकूण-1,50,000 रुपये.

जूननंतर किमती वाढणार : केंद्राने सोलार पॅनलवरील जीएसटी ५% वरून १२%, तर सीमाशुल्क ५% वरून ४०% केले. यामुळे सौरऊर्जा प्रकल्पाच्या किमती वाढतील. जूनअखेरीस नवीन दर लागू होतील, अशी माहिती मेडातील अधिकाऱ्यांनी दिली.

तीन वर्षांचे वीज बिल असे...
4 खोल्यांच्या घरात *2 टीव्ही *4 पंखे *4 ट्यूब *फ्रिज *2 एसी *2 गीझर *वॉशिंग मशीन *मिक्सर आदी उपकरणे असल्यास दिवसाकाठी 10 ते 12 युनिट वीज जळते. या हिशेबाने...

दैनंदिन वापर : 12 युनिट । मासिक : 12x30 = 360 युनिट मासिक बिल 360 युनिटx11.72 रु.(प्रतियुनिट) = ~4219.20 फिक्स चार्ज 105 रु. + पालिकेचा अधिभार - 10 =110 रु एकूण बिल 4,219.20+110 = 4,329.20 रुपये वार्षिक बिल ~4,329.20x12 = ~52,034 रुपये तीन वर्षांचे वीज बिल रु.51,950.40x 3 = ~1,55,850

सौरऊर्जेतून वीज बिलमुक्तीचे सूत्र

घरात सौरऊर्जेची यंत्रणा बसवण्यासाठी सौर पॅनल व नेट मीटर बसवावे लागते. या मीटरमध्ये येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या विजेची रीडिंग घेतली जाते. सौर पॅनलचे दर केंद्राचे अपारंपरिक ऊर्जा मंंत्रालय ठरवते. ते पुढीलप्रमाणे... 1 किलोवॅटपर्यंत रु.46,923 1 ते 2 किलोवॅटपर्यंत रु.43,140 2 ते 3 किलोवॅटपर्यंत रु.42,020 3 ते 10 किलोवॅटपर्यंत रु.40,991 10 ते 100 किलोवॅटपर्यंत रु.38,236 100 ते 500 किलोवॅटपर्यंत रु.35,886

१ किलोवॅट यंत्रणेतून दररोज- ३.५ ते ४ युनिट वीजनिर्मिती *३ किलोवॅटच्या यंत्रणेतून रोज : १२ युनिट वीजनिर्मिती

बिलात बचत, जमाही
ग्राहकाकडून विजेचा वापर आणि त्याच्याकडून निर्माण सौरऊर्जेतील वीज याचा हिशेब करून बिल दिले जाते. उदा- ३ किलोवॅटच्या प्रकल्पातून दररोज १२ युनिट वीजनिर्मिती होते. वापर १० युनिट असेल तर अतिरिक्त २ युनिट जमा राहतात. निर्मिती १२ व वापर १५ युनिट असेल तर ३ युनिटचे बिल येते.

४०% पर्यंत अनुदान
केंद्राच्या वतीने घरगुती वापराच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या १ ते ३ किलोवॅटसाठी ४०%, तर ४ ते १० किलोवॅटसाठी २५% अनुदान मिळते. १ ते १० किलोवॅटसाठी सरासरी ३०% अनुदान मिळते. यापेक्षा जास्त क्षमतेच्या प्रकल्पासाठी अनुदान नाही. आयुष्य याचे २५ वर्षे आहे. ५ वर्षे कॉप्रिहेन्सिव्ह मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट असतो.

बातम्या आणखी आहेत...