आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीयूसी बंधनकारक:पीयूसी असेल तरच होईल वाहन विम्याचे नूतनीकरण; विमा प्राधिकरणाची सूचना

महेश जोशी | औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापुढे वाहनाच्या क्लेमसाठीही पीयूसी बंधनकारक

आपल्या वाहनाच्या विम्याचे नूतनीकरण करायचे असेल तर आता त्याचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी ) साेबत ठेवावे लागेल. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) सर्व विमा नूतनीकरणासाठी पीयूसीचा नियम सक्तीचा केला आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशावर ताण पडणार असला तरी जास्तीत जास्त वाहनांची प्रदूषण चाचणी केल्याने पर्यावरण संवर्धन होण्यास मदत होईल.

आतापर्यंत वार्षिक रक्कम भरून वाहन विमा काढला जायचा. आता या रकमेसोबत वाहनमालकांना पीयूसी काढावे लागणार आहे. आयआरडीएचे मुख्य व्यवस्थापक (नाॅन-लाइफ) यज्ञप्रिय भरत यांनी २० ऑगस्ट रोजी त्याबाबतचे एक पत्रक जारी केले आहे. प्रदूषण मंडळाची नाराजी : दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर मेहता विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यावर सन २०१८ मध्ये निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने पीयूसी असल्याशिवाय विमा कंपन्यांनी विम्याचे नूतनीकरण करू नये, असे सांगितले होते. मात्र, या आदेशाची पूर्तता होत नसल्याबद्दल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंंडळाने नाराजी व्यक्त केली होती. त्यावर या आदेशाचे पालन करण्याची सूचना आयआरडीएने विमा कंपन्यांना केली आहे.

यापुढे वाहनाच्या क्लेमसाठीही पीयूसी बंधनकारक

आयआरडीएच्या पत्रकाप्रमाणे आता वाहन विम्याच्या नूतनीकरणासाठी पीयूसी सक्तीचे करण्यात झाले आहे. ही सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची सूचना आहे. वाहन विम्याच्या क्लेमसाठीही पीयूसी बंधनकारक आहे. तर पोलिसांनी वाहन पकडल्यास मोटार वाहन नियम २०१९ प्रमाणे आधी पीयूसीची विचारणा केली जाते. - शरद कदम, विमा सेवा पुरवठादार