आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:डिसेंबरअखेर अजिंठा रस्त्याची दुरुस्ती करा; लेण्यांजवळील अभ्यागत केंद्र सुरू करणार

औरंगाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जी-२० राष्ट्रसमूहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने शिखर परिषदेचे प्रतिनिधी १३ व १४ फेब्रुवारी रोजी औरंगाबादला येणार आहेत. त्यामुळे अजिंठा रस्त्याचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिल्या. वेरूळ आणि अजिंठा अभ्यागत केंद्रातील पाणीपट्टी आणि वीज बिलांची थकीत रक्कम देण्यात येणार आहे. १५ जानेवारीपूर्वी अभ्यागत केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जी-२० शिखर परिषदेच्या नियोजनासाठी पूर्वतयारी बैठक गुरुवारी पार पडली. या वेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे उपस्थित होते. जी-२० परिषदेचे ५०० प्रतिनिधी १३ व १४ फेब्रुवारीला औरंगाबाद शहराला भेट देणार आहेत.

वेरूळ, अजिंठा, दौलताबाद येथील पर्यटन तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीचीही पाहणी करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे स्वच्छ ठेवा, पर्यटनस्थळी जाण्यासाठी सूचनाफलक लावा, शहरातील रस्ते दुरुस्त करा, सिल्लोड येथील सात किमीच्या बाह्यवळण रस्त्याचे डांबरीकरण करा, चौका-हर्सूलचे भूसंपादन तातडीने करा, पाहुण्यांची निवास-प्रवास व्यवस्था, आरोग्य सुविधांचे िनयाेजन करण्याच्या सूचनाही दिल्या.

फेब्रुवारी महिन्यात वेरूळ महोत्सवाचे आयोजन
१३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान वेरूळ महोत्सव घेण्याची तयारी सुरू आहे. त्याचाही आढावा घेण्यात आला. एक दिवस वेरूळ आणि दोन दिवस सोनेरी महाल येथे हा महाेत्सव हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...