आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरुस्ती:खचलेल्या विहिरीची रोहयोतून दुरुस्ती

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खचून गेलेल्या िवहिरींच्या दुरुस्ती रोजगार हमी योजनेतून करण्यासाठी नियमात आवश्यक ते बदल लवकरच होणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. या बदलाचा मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी िवधिमंडळात अर्थसंकल्पातील पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. त्यात सहभागी होताना दानवे यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडले. त्यात त्यांनी खचलेल्या िवहिरींचा मुद्दा मांडला. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत विहिरीचा समावेश आहे. पण खचलेली विहीर या योजनेच्या निकषात बसत नाही. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रोहयोतील हा निकष, नियम बदलता येईल का यासाठीही एक व्यापक बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...