आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गंधी:बिडकीन बसस्थानकातील स्वच्छतागृह दुरुस्त करा ; भीमगर्जना संघटनेची विभाग नियंत्रकांकडे मागणी

बिडकीन5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण तालुक्यातील बिडकीन बसस्थानकामधील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आहे. मात्र एसटी महामंडळाचे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे स्वच्छतागृह दुरुस्त करण्याची मागणी भीमगर्जना संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालयातील विभाग नियंत्रक क्षीरसागर यांना भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले की, बिडकीन बसस्थानकातील स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता करण्यात यावी, पार्किंग, पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्या पूर्ण न झाल्यास बस थांबवून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. भीमगर्जना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष के.ए.काझी, राज्य सचिव इलियास शेख, सरचिटणीस अशोक गरुड, जिल्हा प्रभारी शेख राजू, जिल्हा कार्याध्यक्ष फेरोज मिर्झा, तालुका सल्लागार वसंत शेजूळ, बिडकीन युवक शहराध्यक्ष नितेश साकळकर, बिडकीन कार्याध्यक्ष सलीम पठाण आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...