आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक गुणवत्ता:निजामकालीन शाळांच्या दुरुस्ती कामांना सुरुवात ;11 कोटी 57 लाख 69 हजार निधीची तरतूद

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत जिल्ह्यातील निजामकालीन प्राथमिक व माध्यमिक शाळांचे नवीन बांधकाम सुरू झाले आहे. मात्र, अल्प निधीमुळे आदर्श शाळांची कामे रखडल्याचे खुद्द अधिकाऱ्यांनीच सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यात ८१ शाळांतील १७३ वर्गखोल्यांची पुनर्बांधणीची कामे व १३० शाळांमधील दुरुस्तीच्या कामासाठी राज्य शासनाने प्राथमिक स्वरूपात मोठ्या बांधकामासाठी ८ कोटी ८७ लाख, तर छोट्या कामासाठी ३ कोटी ३८ लाख १५ हजार असे एकूण ११ कोटी ५७ लाख ६९ हजार रुपये निधीची तरतूद केली आहे.

जिल्ह्यातील ८१ शाळांतील १७३ वर्गखोल्यांची मोठी बांधकामे मंजूर आहेत. त्यापैकी ५३ वर्गखोल्यांचे प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यासाठी २० टक्के लोकसहभाग प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यानंतर जिल्‍ह्यात वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी १३० पैकी ४९ शाळांचे प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी ३५ शाळांमध्ये वर्गखोल्यांचे नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे. उर्वरित दुरुस्तीच्या कामांचे प्रस्ताव प्राप्त होत आहेत. या लहान-मोठ्या कामांसाठी शासनाकडून ११ कोटी ५७ लाख प्राप्त झाले आहेत.

तसेच जिल्ह्यातील १७ आदर्श शाळा करणार आहेत. यात मनपाच्या दोन, तर जिल्हा परिषदेच्या १५ शाळांचा समावेश आहे. प्रत्येक शाळेला ३३ लाख १९ हजार रुपये मंजूर केले आहेत. या १७ शाळा आदर्श करण्यासाठी शासनाकडून जिल्ह्याला २० कोटी ९७ लाख रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ २ कोटी ९७ लाख प्राप्त झाले आहेत. त्यातून केवळ एका शाळेचे काम सुरू आहे. लोकसहभागासाठी आवाहन केल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...