आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद पोटच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करुन तिला जीवे मारण्याची धमकी देणार्य नराधम पित्याला पॉक्सोच्या कलम 6 अन्वये 20 वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली एक लाख 41 हजारांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के.आर. चौधरी यांनी बुधवारी (3 ऑगस्ट) ठोठावली. खटल्यात आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात पीडिता तिचा भाऊ आणि डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली.
प्रकरणात 15 वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. त्यानूसार, पीडिता ही आई, वडील व भावासोबत रहात होती. तर तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न झालेले असल्याने ती सासरी राहत होती. 4 मार्च 2019 रोजी दोन दिवस पीडितेला मारहाण करुन बळजबरी बलात्कार केला. 6 मार्च 2019 रोजी पीडितेने घडलेला प्रकार आईला सांगितला, तेंव्हा थोडा दम मार मी करते काहीतरी असे आईने सांगितले.
वारंवार पीडितेवर अत्याचार
8 मार्च 2019 रोजी नराधमाने पीडिता व तिच्या भावाला घरा बाहेर झोपायला सांगितले. मध्यरात्रीनंतर अंदाजे दोन वाजेच्या सुमारास बलात्कार केला. शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये नराधमाने बलात्कार केला. 19 मार्च 2019 रोजी पीडितेची आई नातेवाईकाच्या लग्नासाठी गेली होती. त्यावेळी डाव फसला. दुसऱ्या दिवशी बळजबरी बलात्कार केला.24 मार्च 2019 रोजी पीडितेची आई लग्नाला गेली तर तिचा भाऊ राशन आणण्यासाठी गेला होता, त्यावेळी बलात्कार केला.
9 एप्रिल 2019 रोजी एका शेतात पीडितेवर बळजबरी बलात्कार केला. हा प्रकार पीडितेने आईला सांगितला. मात्र आई काहीच करत नव्हती. पीडितेने घडत असलेला प्रकार लग्न झालेला बहिणीला फोनवरुन सांगितला. बहिणीने हा प्रकार मामाला सांगितला. त्यानूसार 18 एप्रिल 2019 रोजी मामा पीडितेच्या घरी आला. त्यानंतर पीडिता तिची आई आणि भावाने सोयगाव पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.
पीडिता, भाऊ आणि डॉक्टरांची साक्ष महत्वाची
तत्कालीन उपनिरीक्षक एस.बी. वाघमारे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता ज्ञानेश्र्वरी नागुला (डोली) यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात पीडिता तिचा भाऊ आणि डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी नराधम पित्याला भादंवी कलम 376 (जे)(एन) अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपयांचा दंड, कलम 323 अन्वये एक वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलम 6 अन्वये 20 वर्षे सक्तमजुरी, 20 हजार रुपये दंड, कलम 8 अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी, 10 हजाररुपये दंड, बाल न्याय कायद्याच्या कलम 75 अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.