आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावणेदोन कोटीचा खर्च:जुन्या पाणी योजनेवरील 125 व्हॉल्व्ह बदलणार

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गळती थांबवण्यासाठी ५६ आणि १०० एमएलडीच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेवरील सर्व व्हॉल्व्ह बदलण्याचा निर्णय मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने घेतलाआहे. त्यासाठी पावणेदाेन काेटी रुपये खर्चून कोलकाता येथून १२५ व्हॉल्व्ह खरेदी करण्यात आलेआहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार हर्सूल तलावातून ७.५ आणि जायकवाडीतून अतिरिक्त ५ एमएलडी पाणी उपसा सुरूआहे. तसेच एमआयडीसीकडून टँकरने तीन एमएलडी पाणी दिले जात आहे. त्यामुळे पाच दिवसांआड समान पाणी वाटप सुरू झाले आहे. त्यात आणखी सुधारणा करण्यासाठी दोन्ही जुन्या योजनांवरील मुख्य पाइपलाइनसह सातशे ते तीनशे दरम्यानच्या पाइपलाइनवरील व्हॉल्व्ह बदलले जातील. नवीन व्हॉल्व्हची खरेदी कोलकाता येथील आयबीएम कंपनीकडून करण्यात आली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात व्हॉल्व्ह शहरात येतील. मुख्य पाइपलाइनवरील १५ मोठे व्हॉल्व्ह बदलण्यात येतील. त्यामुळे पाणी गळती रोखण्यास मदत होऊन पाइपलाइन दुरुस्तीसाठी लागणारा वेळ वाचणारआहे. शहरात जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी फीडर लाइन, जलकुंभावरून पाणी वितरणाची मुख्य लाइन, मुख्य लाइनला जोडणाऱ्या सबलाइनवरील व्हॉल्व्ह बदलले जातील.