आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Report Children Who Have Been Orphaned By Corona By Thursday, Instructions To The Divisional Deputy Director Of Education Of The Director Of Primary Education

औरंगाबाद:कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या मुलांची  माहिती गुरुवारपर्यंत कळवा, प्राथमिक शिक्षण संचालकांच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांना सूचना

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या 23 ऑगस्टपूर्वी शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.

मार्च 2020 नंतर कोरोनामुळे अथवा इतर कारणांमुळे पालकांचे छत्र हरपलेल्या अंशतः किंवा पूर्णतः निराधार झालेल्या बालकांची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून गुरुवारपर्यंत (दि.19) मागवण्यात आली आहे. याबाबत राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना आदेश देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने 27 जुलै रोजी दिलेल्या आदेशान्वये मार्च 2020 नंतर कोविडमुळे अथवा इतर कारणांमुळे आई, वडील अथवा दोन्हीही पालक गमावल्यामुळे अंशतः किंवा पूर्णतः निराधार झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण खासगी अथवा शासकीय शाळेमध्ये नियमित सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच राज्यातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या 23 ऑगस्टपूर्वी शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमधील माहे मार्च 2020 नंतर कोरोनामुळे अथवा इतर कारणांमुळे आई, वडील अथवा दोन्ही पालक मृत झाल्यामुळे अंशतः किंवा पूर्णतः निराधार झालेल्या विद्यार्थ्यांची महिती गुरुवारपर्यंत (दि.19) संकलित करून सादर करावी. संकलित केलेली माहिती कोणत्याही प्रकारे अपूर्ण व त्रोटक स्वरूपाची नसावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सर्व विभागीय उपसंचालकांना पत्राद्वारे दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...