आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा अंदाज:आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कळवा : म्हस्के

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फेही जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून याबाबत मंत्रालय पातळीवर उपसचिवांच्या माध्यमातून आढावा घेण्यात येत आहे. त्याबाबत सतर्कतेच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर पावसाची नोंद झाल्यास तसेच आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला कळवावे, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के यांनी केली आहे. सर्व नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन करावे, असे आवाहनही मारुती म्हस्के यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...