आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्व विद्यापीठांचे संशोधन, अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी पाहण्याचा सुवर्णयोग महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आला. सिल्लोडमधील हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सव उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. या वेळी मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, अतुल सावे, खा. इम्तियाज जलील, कृषी आयुक्त सुनील चव्हाण आदी हजर होते.
विविध दालनांना भेट
या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रदर्शनातील विविध दालनास भेट दिली. या दालनात विद्यापीठाच्या वतीने विकसित तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, उत्पादनक्षम शेती, एकात्मिक पीक व्यवस्थापन, पाणलोट क्षेत्र विकास यासह कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती विविध दालनातील आयाेजकांकडून मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. यामुळे सर्वांचाच उत्साह द्विगुणित झाला.
पहिल्याच दिवशी हजारो शेतकऱ्यांची प्रदर्शनास भेट
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रविवारी राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी भेट दिली. या वेळी महिलांचीही लक्षणीय उपस्थिती हाेती. विविध ठिकाणच्या दालनाला भेट देत शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. प्रदर्शनात शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी शेतकरी आपल्या मोबाइलमध्ये प्रदर्शनातील क्षण चित्रे टिपत होते, तर काही जण सेल्फी घेत हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.