आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासपूर्ण विचार:विद्यापीठात संशोधक विद्यार्थ्यांची अंदाजपत्रकावर चर्चा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभाग आणि नियोजन मंडळाने अंदाजपत्रक पूर्व चर्चासत्र बुधवारी आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. पी. व्ही. देशमुख हे होते . प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.धनश्री महाजन उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला एमए आणि संशोधक विद्यार्थी यांची उपस्थिती होती. या चर्चासत्रामध्ये उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे अंदाजपत्रक पूर्व विचार मांडले. शेती, उद्योग, ग्रामीण विकास, आरोग्य शिक्षण, संशोधन, आधारभूत संरचना, संरक्षण, पर्यावरण यासारख्या महत्त्वपूर्ण विषयाच्या अनुषंगाने संशोधक विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडून अंदाजपत्रकाकडून असलेल्या अपेक्षा मांडले. सूत्रसंचालन डॉ. कृतिका खंदारे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...