आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदाबावर प्रभावी औषध शोधले:राज्यातील 3 संशोधकांना मोठे यश, केंद्र सरकारकडून मिळाले​​​​​​​ पेटंट

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रक्तदाब या घातक विकारामुळे जगभरातील लाखो लोक त्रस्त आहेत. या आजारावर नियंत्रण आण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करीत आहेत. अशातच राज्यातील 3 संशोधकांना रक्तदाबावर प्रभावी औषध शोधण्यात मोठे यश आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या औषधाला केंद्र सरकारकडून पेटंटचे अधिकारदेखील प्राप्त झाले आहेत. औरंगाबादचे डॉ. आनंद कुलकर्णी, जळगावचे डॉ. जितेंद्र नाईक आणि डॉ. संजय तोष्णीवाल यांनी ही मोलाची कामगिरी केली आहे.

औषधी गुणधर्म सिद्ध

औषधासाठी संधोधकांना पेटंट कार्यालय, भारत सरकार येथून नुकतेच प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांना पेटंट क्रमांक ३९८५६२ देण्यात आला आहे. पेटंटमध्ये रक्तदाबावरील संधोधकांनी शोधून काढलेले औषध व त्याचे सुत्रीकरण 'सस्टेन्ड रिलीज मॅटोप्रोलॉल सॅक्सिनेत टॅबलेट फॉर्म अँड प्रेपरेशन देयर ऑफ' याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शास्त्रोक्त पद्धतीने रक्तदाबावरील त्याचे औषधी गुणधर्म सिद्ध करून दाखवल्याचे पेटंटमध्ये म्हटले आहे.

प्रभावी सुत्रीकरण केले

रक्तदाबावरील या नवीन औषधाचे विदर्भ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, वाशिमचे संचालक डॉ. संजय तोष्णीवाल, डॉ. जितेंद्र नाईक आणि डॉ. आनंद कुलकर्णी यांनी संयुक्तरित्या प्रभावी सुत्रीकरण केले आहे. याआधी डॉ.संजय तोष्णीवाल यांना कर्करोगावरील औषधाच्या संशोधनाकरिता जर्मनी येथून आणि संधिवाताच्या औषधाच्या संशोधनाकरिता भारत सरकारद्वारे पेटंट देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...