आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्त जागा भरण्यासह विविध मागण्या:घाटी रुग्णालयासह राज्यभरातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घाटीतील निवासी डॉक्टर सोमवारपासून संपावर जाणार आहेत. सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमधील फरक भरून काढावा या आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टरांनी हा संप पुकारला आहे. घाटीत ओपीडी आणि आयपीडी सुविधा बंद करण्यात येणार असल्याची माहिती ‘मार्ड’चे उपाध्यक्ष ऋषीकेश फडणीस यांनी दिली. मात्र, संपाचा कुठलाही परिणाम रुग्णव्यवस्थेवर होणार नाही यासाठी तयारी पूर्ण केली असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी दिली. सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक यांच्या राज्यात १४३२ जागा रिक्त आहेत. याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही या जागा भरत नाही. तसेच २०१८ पासून महागाई भत्ता वाढवण्यात आलेला नाही, तो वाढवण्याची मागणी मार्डच्या वतीने करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...