आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:रहिवाशांची सिडकोच्या विरोधात कृती समिती

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवासी घरात व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात सिडको प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. अशा घरांना नोटीस बजावून त्यांच्याकडून वाणिज्य वापरापोटी रक्कम भरण्यास सुरुवात केली आहे. रक्कम न भरणाऱ्यावर ३० नोव्हेंबरनंतर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. सिडकोने बजावलेली नोटीस मागे घ्यावी यासाठी सिडकोतील छोट्या व्यावसायिकांनी सिडको प्रशासनाविरोधात कृती समिती स्थापन केली आहे.

समितीच्या वतीने सिडको प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. उदरनिर्वाहासाठी कामगारांनी छोटा व्यवसाय राहत्या घरात सुरू केला. अर्ध्या घरात दुकान आणि उर्वरित भाग निवासासाठी वापरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करू नये, असे निवेदनात म्हटले आहे. ज्यांना नोटिसा आल्या संपर्क साधावा असे आवाहन राजू टंकसाळे, राजा लिंगायत, संजय जैन आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...