आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेबर कॉलनी:दुसरे घर नसलेल्या लेबर कॉलनीतील रहिवाशांना शासनाकडून मिळणार घरे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेबर कॉलनीतील ३३८ घरे प्रशासनाने बुधवारी जमीनदोस्त केली. येथील ज्या रहिवाशांच्या नावे दुसरीकडे घर नाही त्यांंच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. संबंधितांनी कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

ज्यांना घरे नाहीत अशा लोकांनी आपले आधार कार्ड आणि त्यांच्याकडे घरे नसल्याची कागदपत्रे कक्षात जमा करावीत. त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्यात येतील. मात्र, ज्या लोकांनी लेबर कॉलनीत अतिक्रमण केले होते, त्यांच्या नावावर अगोदरच घरे आहेत त्यांना याचा लाभ मिळणार नाही, असे चव्हाण म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...